Head Ads

loading...

Featured Posts

[बातम्या][feat1]

भारताचा सात बारा हा सम्राट अशोक यांच्या नावावर आहे आणि जिथं पहाल तिथं तथागत बुद्ध आहे।

September 30, 2020


1) सम्राट अशोकाचे चक्र राष्ट्र ध्वजावर घेतले.👍

 काल्पनिक रामाचे नाही।👎

2) सम्राट अशोकाचे " सत्यमेव जयते " हे ब्रीद वाक्य म्हणून देशाने स्वीकारले .👍

काल्पनिक रामाचे नाही।👎

3)ज्या सम्राट अशोकाची चार सिंहाची प्रतीमा देशाची मुद्रा म्हणून स्विकारली.👍

काल्पनिक रामाचे नाही।👎

4) ज्या  राजाला देशाचा सर्वोत्तम तथा सर्वश्रेष्ठ राजा म्हणून मानले जाते.👍

काल्पनिक रामाला नाही।👎

5) सम्राट अशोकामुळे भारताला जगात  नावलौकिक  प्राप्त झाले.👍

काल्पनिक रामामुळे नाही।👎

6) अशोकामुळे सबंध विश्व भारताला अशोकाचा भारत म्हणून  ओळखते.👍

काल्पनिक रामाचा नाही।👎

7) ज्याच्या नावाने देशाचा  सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्र दिल्या जाते. 👍

काल्पनिक रामाचे नाही।👎

8)  सम्राट अशोका मुळे भारताला जम्बूदीप भारत म्हणून ओळख प्राप्त झाली.👍

काल्पनिक रामामुळे नाही।👎

09) अशोका सम्राटामुळे भारतीय बौद्ध धर्म विश्व धर्म बनला.

10) ज्या महान अशोकाला सबंध जग देवानांप्रिय  प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट म्हणून ओळखतात.

जय भिम 🙏

भारताचा सात बारा हा सम्राट अशोक यांच्या नावावर आहे आणि जिथं पहाल तिथं तथागत बुद्ध आहे।  भारताचा सात बारा हा सम्राट अशोक यांच्या नावावर आहे आणि जिथं पहाल तिथं तथागत बुद्ध आहे। Reviewed by M R on September 30, 2020 Rating: 5

सूर्यग्रहणात ज्या गरोदर महिलेने भाजी चिरली होती, त्या महिलेनी दिलाय सदृढ बाळाला जन्म..

September 28, 2020



'ग्रहणामुळे बाळाला व्यंग निर्माण होते' ही अंधश्रद्धा - अंनिस
"महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने इस्लामपूर येथील गर्भवती महिलेने ग्रहण काळातील अंधश्रद्धा झुगारून स्वतः ग्रहण पाहिलं त्या महिलेची नुकतीच प्रसूती झाली असून तिने एका छानशा कन्येला जन्म दिला आहे.  ते बाळ सदृढ व निरोगी आहे.  ग्रहणाचा मानवी जीवनावर कसलाही परिणाम होत नसल्याचे सिद्ध झाले आहे", अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी दिली. 
        इस्लामपूर जिल्हा सांगली येथील सौ समृद्धी चंदन जाधव या तरुणीने 21 जून रोजी झालेल्या  सूर्यग्रहण काळात गर्भवती असूनही ही ग्रहण काळात ज्या गोष्टी करायच्या नाहीत त्या सर्व निर्भयपणे केल्या. त्यामध्ये भाजी चिरणे, पाने फुले फळे तोडणे, अन्नपदार्थ खाणे, पाणी पिणे, हाताची घडी घालने, मांडी घालून बसणे, एवढेच नव्हे तर सोलर फिल्टर मधून ग्रहण ही  पाहिले. समाजात ग्रहणा बाबत मोठ्या अंधश्रद्धा आहेत
          ग्रहण काळात गर्भवती महिलेने अशा काही गोष्टी केल्यास  जन्माला येणार अपत्य हे व्यंग घेऊन येतं किंवा त्या बाळाला जन्मताच काही दोष तयार होतात ,असे गैरसमज आहेत. हे गैरसमज व अंधश्रद्धा दूर करण्याचं काम महा. अं नि स  सातत्याने  करत आहे. राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे आणि कार्यकर्त्यांनी या जाधव कुटुंबियांचं प्रबोधन केलं आणि खात्री दिली की ग्रहण काळामध्ये  मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही .त्यामुळे गर्भवती महिलेवर सुद्धा किंवा होणाऱ्या बाळावर  कोणते परिणाम होणार नाहीत.त्यामुळे हे कुटुंबीय ग्रहण काळातील अंधश्रद्धा झुगारून देण्यास तयार झाले. ग्रहण काळात  जे जे करायचे नाही ते ते सर्व या गर्भवती महिलेने धाडसाने केले. जाधव कुटुंबियातील समृद्धी ची सासू सिंधुताई, पती चंदन, दीर दीपक यांचे सहकार्य आणि प्रोत्साहन मिळाले.
          काही दिवसांपूर्वीच समृद्धीची प्रसूती झाली. तिला कन्यारत्न झालं. ही मुलगी  गुटगुटीत व निरोगी असून. कुटुंबात आनंदी वातावरण बनले आहे. ग्रहणाचा या बाळावर ,तिच्या आईवर कोणताही परिणाम झाला नाही. अनेक अंधश्रद्धा तुन भीती तयार होते आणि त्यातून मानसिक गुलामगिरी तयार होते. या सर्वाला मुक्त करण्याचे काम जाधव कुटुंबीयांनी करून समाजापुढे एक नवा पायंडा उभा केला आहे. सामान्य कुटुंबात असूनही ही त्यांनी उचललेलं पुरोगामी पाऊल  निश्चितच कौतुकास्पद आहे.
          यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सौ समृद्धी जाधव म्हणाल्या, "ग्रहणाचा मानवी जीवनावर, गर्भवती महिलेवर किंबहुना त्याच्या बाळावर कोणताही परिणाम होत नाही हा माझा अनुभव आहे. अं नि स च्या कार्यकर्त्यांनी माझं व माझ्या कुटुंबाचे प्रबोधन केल्यामुळे हे धाडसाचे पाऊल उचलू शकले. आधुनिक काळात अशा अंधश्रद्धांना आपण बाजूला केले पाहिजे. यापुढील प्रत्येक ग्रहणाच्या वेळी मी व माझे कुटुंबीय प्रबोधन करणार .'विज्ञान निर्भयता नीती नसे कशाचीही भीती' ही घोषणा सर्वांनी लक्षात ठेवावी."
          "समृद्धी जाधव यांनी टाकलेलं कृतिशील पाऊल समाजाला प्रेरणादायी ठरेल. या कृतिशिल उपक्रमाने पुढील काळात ग्रहणाच्या वेळी लोकांची जागृती करण्यासाठी हे उदाहरण महत्त्वाचे ठरेल. खगोलीय आविष्कार आणि ग्रहण याबाबत अनिस नेहमीच प्रबोधन करते" असे प्रतिक्रिया महाराष्ट्र अं नि स राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी दिली.
सूर्यग्रहणात ज्या गरोदर महिलेने भाजी चिरली होती, त्या महिलेनी दिलाय सदृढ बाळाला जन्म..  सूर्यग्रहणात ज्या गरोदर महिलेने भाजी चिरली होती,   त्या महिलेनी दिलाय सदृढ बाळाला जन्म.. Reviewed by M R on September 28, 2020 Rating: 5

रामदासजी, तेव्हा का नाही `आठवले'? -नरेंद्र विश्वनाथराव वाबळे

September 27, 2020


एका माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केली म्हणून कविश्रेष्ठ ना. रामदास आठवले अस्वस्थ झाले आहेत. बेचैन झाले आहेत. त्यांची झोप उडाली आहे. महाराष्ट्रात हे काय चालले आहे? या प्रश्नाने ते चिंतातूर झाले आहेत. ऊठसूट चारोळ्या करणारे शीघ्र कवी रामदासजी आता कविता करीनासे झाले आहेत. त्यांचे कशातच लक्ष लागेनासे झाले आहे. म्हणूनच त्यांनी संतप्त होऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर थोडे भूतकाळात डोकवायला हवे. काही वर्षांपूर्वी एका माजी सैनिकाला घर खाली करण्यासाठी घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आली. त्याच्यावर तलवारीने वार करण्यात आले. देशाचे रक्षण करण्यासाठी सीमेवर सदैव तैनात राहिलेल्या या माजी सैनिकाचा जीव त्याच्या देशातच धोक्यात आला. या प्रकरणी भाजपचे जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पण भाजप सत्तेत असताना तब्बल तीन वर्षे या पाटील बुवांविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याची दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पण तरीही आरोपी मोकाट राहिला. आरोपींना अटक करा, म्हणून न्यायालयाने पुन्हा आदेश दिले. पण काही उपयोग झाला नाही. पोलिसांवर खासदार दबाव टाकतात असा आरोप या माजी सैनिकाने न्यायालयात केला. आजही हा माजी सैनिक, गेली चार वर्षे, न्याय मागतो आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या राजवटीच्या काळात एवढी गंभीर घटना घडूनही महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणे रामदासजींना का नाही आठवले? बरं ते जाऊ द्या. त्रिपुरामध्ये भाजपची राजवट आहे. तेथे मुख्यमंत्री विप्लव देव यांच्यावर एका पत्रकाराने टीका केली. त्या पत्रकाराला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. सदर पत्रकार सध्या दहशतीच्या छायेत वावरतो आहे. तर रामदासबुवा, त्रिपुरामध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे आपल्याला का नाही आठवले?
रामदास आठवले हे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आहेत. ते दीर्घकाळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या छत्रछायेखाली होते. काँग्रेसने त्यांना राज्यात मंत्रिपदापासून ते केंद्रात खासदारकी पर्यंत सर्व काही दिले. त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणुकांमध्ये पाठिंबा देखील दिला. त्यांच्या पक्षाला जसे मुंबईचे महापौरपद दिले तसे विधान परिषदेतील सदस्यत्व देखील बहाल केले. पण काँग्रेस सोबत असताना रामदासबुवा शिर्डी मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणूकीत पराभूत झाले. त्यामुळे त्यांचा संताप इतका अनावर झाला की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याशी दगाबाजी केली म्हणून ते या दोन्ही पक्षांच्या नावाने बोटे मोडू लागले. या पक्षांना लाखोल्या वाहात असताना चोरट्या नजरेने शिवसेना-भाजप युतीकडे पाहू लागले. युतीच्या जवळ जावू लागले. दिवस-रात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणारे रामदासबुवा बाबासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन भाजपला मिठ्या मारू लागले. त्यांची राजकीय दिशा हळूहळू स्पष्ट होऊ लागली. शेवटी एकदाचे त्यांनी `कमळ' हाती घेतले. परिणामी, त्यांचा भाग्योदय झाला. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात राज्यमंत्रीपद दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर केंद्रात मंत्रिपद लाभलेला रिपब्लिकन पक्षाचा दुसरा नेता म्हणून आमच्यासह अनेकांनी त्यांची पाठ थोपटली. पण आंबेडकरांचे हे लेकरू भाजपचे प्रचारक कधी बनले हे त्याचे त्यालासुद्धा कळले नाही. ऊठसूट भाजपची वकिली करणारे रामदास आठवले इतके दिवस केवळ हास्यास्पद वाटत होते. पण भाजपच्या इशाऱ्यावर नाचत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे रामदास आठवले आता भेसूर आणि भीषण वाटत आहेत. भाजपने महाराष्ट्र सरकारवर सोडलेला सैतान वाटत आहेत. राजकारणात दोन द्यायच्या असतात आणि दोन घ्यायच्या असतात. पण आठवले हे दोन देण्याचे काम भाजपची सुपारी घेऊन करत आहेत हे अतिशय वाईट आहे. भाजप राजवटीत चालणारे कुकर्म त्यांना दिसत नाही. महाराष्ट्रात मात्र जिकडे तिकडे त्यांना असुरक्षितता दिसत आहे. म्हणूनच कंगना राणावत नावाच्या नटीला संरक्षण देण्यापासून ते माजी नौदल अधिकाऱ्याच्या मारहाणीवरून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यासारखे बालिश प्रकार ते करत आहेत. आठवले यांची दिवसेंदिवस अधोगती सुरू आहे, याचे आम्हाला वाईट वाटते.

(दैनिक ‘शिवनेर’चा दि. १५ सप्टेंबर २०२०चा अग्रलेख.)
रामदासजी, तेव्हा का नाही `आठवले'? -नरेंद्र विश्वनाथराव वाबळे  रामदासजी, तेव्हा का नाही `आठवले'?   -नरेंद्र विश्वनाथराव वाबळे Reviewed by M R on September 27, 2020 Rating: 5

आरक्षण देता येत नसेल, तर सगळेच आरक्षण रद्द करा : उदयनराजे

September 26, 2020



प्रत्येकाला बुध्दी दिलेली आहे. मी अनेकदा सांगितलं आहे, आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा व मेरिटवर निवड करा, अशी रोखठोक भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी मांडली.शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी आज (ता. २६) साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुण्यात तीन ऑक्टोबरला होणाऱ्या विचारमंथन बैठकीस उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. यावेळी दोन्ही नेत्यांनी आरक्षण प्रश्नावर तासभर चर्चाही केली. यावेळी माजी सभापती सुनील काटकर, शरद काटकर, हरिष पाटणे उपस्थित होते.

उदयनराजे पुढे म्हणाले, मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर या समाजात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. त्याला वाचा फोडण्यासाठी येत्या तीन ऑक्टोबरला मराठा समाजातील प्रमुख लोकांची बैठक होत आहे. मुळात हा आरक्षणाचा प्रश्न निर्माणच व्हायला नको होता. मराठा समाजाची माफक मागणी होती, प्रत्येकाला ज्या पध्दतीने आरक्षण दिले, त्या पध्दतीनेच आम्हालाही मिळावे. संपूर्ण कष्ट करण्याची तयारी असताना ही या समाजावर अन्याय झाला आहे. प्रत्येकवेळी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला की, इतर लोकांकडून विरोधात मोर्चे काढले जातात, कशासाठी? असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले, आज बऱ्याशा मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यांच्या मुलांनी व तरूणांनी जायचे कुठे, शेवटी व्यक्ती कोणही असली तरी शिक्षणाबाबत बोलायचे झाले तर मराठा समाजातील मुला-मुलींना चांगले मार्कस्‌ मिळाले तरी त्याला ॲडमिशन मिळात नाही. उलट कमी मार्कस्‌ असलेल्यांना ॲडमिशन मिळते. कोणताही विद्यार्थी असू देत, प्रत्येकाला बुध्दी दिलेली आहे. मी अनेकदा सांगितलं आहे, आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा व मेरिटवर निवड करा. त्यांनी कष्ट घेतले नाही आणि मराठ समाजातील मुलाने कष्ट घेऊन चांगले मार्क मिळविले. पण, त्याला ॲडमिशन न मिळाल्याने नैराश्य येते.

काही लोक आत्महत्या करतात, काही नेस्तनाबूतही होतात. त्यामुळे मराठा समाजाच्या मुलाने आपली महत्वाकांक्षा कशी पूर्ण करायची, असा प्रश्न उपस्थित करून उदयनराजे म्हणाले, राज्य शासन, केंद्र शासन असून देत ही सर्व माणसेच आहेत. त्यांनी थोडेसे माणुसकीच्या दृष्टीने विचार करायला हवा. ते मराठा समाजात जन्माला आले असते, तर आज जे माझे मत आहे, तेच मत त्यांचेही असते. पुण्यातील या बैठकीत ठोस चर्चा होईल. तेथे माझ्यापेक्षा वडीलधारी मंडळी असणार आहेत. त्यांचा अनुभव लक्षात घेता नेतृत्व कोणी करायचे हे महत्वाचे नाही, सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे. शासन, राजकिय पक्ष व न्यायालय असेल यांनीही जबाबदारी घेऊन निर्णय घेतला पाहिजे. तसे झाले नाही तर उद्रेक होईल त्याला जबाबदार कोण, लोक हातश झाल्यावर काय करणार, असा प्रश्न उदयनराजेंनी उपस्थित केला. दुसऱ्याचे कमी करून आम्हाला द्या, असे मराठा समाजातील कोणीही म्हणत नाही. त्यांना दिले तसेच मराठा समाजाला देऊन टाका, अशी आमच्या सर्वांची मागणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जात पात पाहिली नाही. सर्वधर्म समभावातून स्वराज्याची स्थापना केली. सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांनी वाटचाल केली. त्यांना आपण दैवत म्हणून बघतो, त्यांचेच विचार घेऊन आज आपण या प्रश्नावर वाटचाल केली पाहिजे, अशी अपेक्षाही उदयनराजेंनी शेवटी व्यक्त केली.

आरक्षण देता येत नसेल, तर सगळेच आरक्षण रद्द करा : उदयनराजे आरक्षण देता येत नसेल, तर सगळेच आरक्षण रद्द करा : उदयनराजे Reviewed by M R on September 26, 2020 Rating: 5

मोदींच्या मदतीला धावून जाणारी भाजपची बी टीम राष्ट्रवादी काॅंग्रेस ? ए अंदर की बात हैं

September 26, 2020


 मोदींच्या मदतीला धावून जाणारी भाजपची बी टीम राष्ट्रवादी  काॅंग्रेस ?  ए अंदर की बात हैं, #शरद_पवार_हमारे_साथ_हैं

महाराष्ट्र
राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल सभागृहात कृषी विधेयकावर बोलले पण त्यांनी या विधेयकाला कुठेही विरोध केला नाही, फक्त त्यांनी सभात्याग केला. मी तुम्हाला इतकंच सांगू शकतो की एक घोषणा आहे ना… ‘ये अंदर की बात है’, त्याप्रमाणे ‘ये अंदर की बात हैं…शरद पवार हमारे साथ हैं, असं नितेश म्हणाले.

कृषी विधेयकावरून त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. शेती आणि शिवसेनेचा कसलाही संबंध नाही. कृषी विधेयकावर संजय राऊतांनी तळ्यात मळ्यात भाषण केलं. त्यांच्या पक्षाला नेमकं कुठं जायचंय, त्यांच्या पक्षाची नेमकी भूमिका काय आहे त्यांना हेच माहिती नाही, अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

नितेश राणे म्हणाले, जेव्हा हे विधेयक सभागृहात मांडण्यात आलं तेव्हा महाविकास आघाडीतील दुसरे पक्ष मग राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, आपण जर त्यांच्या नेत्यांची भाषणं व्यवस्थित ऐकली तर असं लक्षात येईल की संजय राऊतांनी तळ्यात मळ्यात भाषण केलं. त्यांना माहितीच नाही की त्यांच्या पक्षाला नेमकं जायचंय कुठं, किंबहुना शेती कुठे करतात आणि कशी करतात हे त्यांच्या नेतृत्वाला माहिती नाही. शेतीवर ते कधीही भूमिका घेत नाहीत.

काँग्रेस कृषी विधेयकाला करत असलेल्या विरोधावर बोलताना नितेश म्हणाले, “काँग्रेस पक्ष आज पुढे येऊन आंदोलन करतोय पण स्वत: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांचे 2013 ला विधान आहे की आम्ही जर सत्तेत आलो की बाजार समित्या रद्द करू.
तसंच 2019 च्या जाहीरनाम्यात देखील त्यांनी तेच आश्वासन दिलं होतं. ते जे करणार होते तेच आताच्या सरकारने पाऊल उचललं आहे मग त्यांचा आता विरोध कशासाठी? की फक्त विरोधाला विरोध करायचा म्हणून ते विरोध करतायत?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

संपूर्ण देशभरातला शेतकरी पंतप्रधान मोदींच्या पाठीशी खंबीरपणा उभा आहे. काही मोजकी राज्य सोडली तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना विश्वास की आम्हाला मोदींनी न्याय दिलाय. केंद्र सरकारने आमच्या भविष्याला आकार दिलाय, त्यामुळे विरोधकांच्या आंदोलनाला काही अर्थ नाही, असंही ते म्हणाले.

शरद पवारांचा कृषी विधेयकाला विरोध नाहीच- देवेंद्र फडणवीस

मोदींच्या मदतीला धावून जाणारी भाजपची बी टीम राष्ट्रवादी काॅंग्रेस ? ए अंदर की बात हैं  मोदींच्या मदतीला धावून जाणारी भाजपची बी टीम राष्ट्रवादी  काॅंग्रेस ?  ए अंदर की बात हैं Reviewed by M R on September 26, 2020 Rating: 5

सत्य स्विकारा; गायीच्या पोटातील ३३ कोटी देव गायीचे रक्षण करू शकत नाही त्यासाठी माणसांना कायदे करावे लागतात आश्चर्य आहे राव.

September 26, 2020



गायीच्या पोटातील ३३ कोटी देव गायीचे रक्षण करू शकत नाही त्यासाठी माणसांना कायदे करावे लागतात आश्चर्य आहे राव...

निर्जीव खांबातून नरसिंह बाहेर येतो... आणी सजीव गाईतून कत्तलखान्यात नेली तरी 33 कोटी बाहेर येत नाहीत...
मित्रांनो पुढच्या काळात आपल्याला बहुजन समाजासाठी खुप कष्ट घ्यायची गरज लागणार नाही कारण पुढची पिढी इतकी चिकित्सक आणि हुशार झाली आहे... याच श्रेय मी (तात्पुरता) महाभारत रामायण सिरीयल वाल्यांना देतो. सिरियल बघताना या मुलांना सहज पडणारे प्रश्न...
🔺पांडव कसे जन्माला आले ?
🔺रामाचा खरा बाप कोण ?
🔺आकाशात उडणारे बाण बरोबर समोरासमोर कसे येतात ?
🔺द्रोणाने एकलव्याचा अगंठा कोणत्या अधिकारा खाली घेतला ?
🔺राक्षसांना शिंगे होती तर त्यांच्या पुढच्या पिढी कुठे आस्तित्वात आहेत ? कारण परशुरामाने पृथ्वी 21 वेळा निक्षेत्रीय केली आहे तरी अजून क्षत्रिय जीवंत आहे मग राक्षशांचे वंसज कुठे आहे
🔺जर त्या लुप्त झाल्या आहेत तर इतिहासात डायनासोर प्रमाणे त्यांचा उल्लेख का नाही ?
🔺विमान वापरणारे पूर्वजांचे वशंज राइट बंधूच्या पेटंटवर ऑब्जेक्शन का घेत नाहीत?
🔺तेव्हा जर विमान होते तर घोङ्यांना का रथाचा त्रास ? विमान असताना.
🔺रणगाङ्यांचा शोध अवघङ होता का ?
🔺हनूमान जर पर्वत उचलून आणू शकत होता तर त्याच पर्वतावर बसवून सर्व सैन्य का नेलं
नाही ? सेतू बांधण्याची उठा ठेव वाचली असती
🔺दुर्योधन जर एका सुतपूत्राला राजा बनवत असेल तर तो समानतेचा पुजारी होता ! मग सगळे पांङवाना का मानतात ?
🔺जर हजारों वर्षापूर्वीच्या ''बौद्ध '' स्तुपांचे आवशेष सापङत असतील तर पांडवाचे महाल त्यांची मोठमोठी शहरं कूठ गेली ?
🔺जर भारतात हजारो वर्षापासून हिंदू धर्म होता तर "बौद्ध " लेण्यांची संख्या एवढी जास्त कशी ?
🔺आणि नेमके "बौद्ध " लेण्यांच्या बाहेर हिंदू देवांची मंदिर कशी ?
🔺हिंदू धर्मातील देवतांनी पृथ्वी आणि जिवांची निर्मिती केली तर भारत सोडून इतर देशात हिंदू देव वा हिंदू धर्म का नाही ?
🔺देवांना वर स्वर्गातून फक्त भारत देश, हिमालय, हिंदी महासागर, गंगा, यमुना नद्या च का दिसत होत्या
🔺त्यांना अमेरिका , फ्राँन्स , इंग्लंड , रशिया , चिन ,जपान , आफ्रिका असे कितीतरी देश आहेत. ते का दिसले नाही किंवा तिथे ते गेले नाही ?
🔺नाईल , अॅमेझोन सारख्या मोठ्या नद्या शंकराच्या जटेतनं का निघाल्या
नाहीत?
🔺त्यांना हिमालय सोडून अंटार्टीका जे हिमालयापेक्शा कीतीही पटीने बर्फाच्छिद आहे तिथं रहायला का गेले नाही ?
🔺३३ कोटी देव असुनही आपण एवढे वर्षे गुलाम , अज्ञानी , मागास कुपोषित कसे ?

अवश्य विचार करा !
सत्याची चिकित्सा करा !
इतिहास वाचा, समजा, समजावून सांगा !
आणि सत्य आहे तेच कबूल करा
जय भारत…
अंधश्रद्धा निर्मुलन
सत्य स्विकारा; गायीच्या पोटातील ३३ कोटी देव गायीचे रक्षण करू शकत नाही त्यासाठी माणसांना कायदे करावे लागतात आश्चर्य आहे राव.  सत्य स्विकारा; गायीच्या पोटातील ३३ कोटी देव गायीचे रक्षण करू शकत नाही त्यासाठी माणसांना कायदे करावे लागतात आश्चर्य आहे राव. Reviewed by M R on September 26, 2020 Rating: 5

गौतम बुद्धांचे आयुष्या बद्दल विचार नक्की वाचा

September 26, 2020


1. एक हजार लढाई जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे हे अधिक चांगले आहे. कारण स्वतःवर विजय मिळवला तर सर्व काही जिंकता येते. ते तुमच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही.  

2. कोणतीही गोष्ट देण्यामध्ये काय सामर्थ्य आहे हे तुम्हाला जर कळत असेल तर तुम्ही कोणत्याही दिवशीचे जेवण हे एखाद्याबरोबर वाटून घेतल्याशिवाय राहू शकत नाही.

3. पाण्याकडून हे शिका - जोराच्या लाटेने  कदाचित झुडुपं विखुरली जाऊ शकतात पण समुद्राची खोली ही मात्र शांत असते. त्यामुळे शांत राहायला शिका

4. कोणते काम करून झाले आहे हे मी कधीच पाहात नाही. कोणते काम करायचे शिल्लक आहे याकडेच माझे लक्ष असते

5. तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला तुम्ही अधिक बिलगता अथवा चिकटून राहता.

6. भूतकाळ आधीच निघून गेला आहे आणि भविष्यकाळाबाबत तुम्हाला कोणतीही माहिती नाही. तुम्हाला जगण्यासाठी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे वर्तमानकाळ. त्यामुळे वर्तमानातच जगा

7. तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे. कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नाही. त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या

8. जीभ ही एखाद्या धारदार सुरीप्रमाणे असते. पण त्यातून आलेले शब्द हे घायाळ करतात, रक्ताचा सडा घालत नाहीत इतकाच फरक आहे. 

9. सर्वांना हे तिहेरी सत्य शिकण्याची गरज आहे - उदार हृदय, दयाळू भाषा आणि सेवा व करूणेचे जीवन हे नेहमीच मानवतेचे  सादरीकरण आणि नूतनीकरण करत असतात


10. जीवनावर प्रेम करणारी व्यक्ती ही नेहमीच विषप्रयोग टाळते त्यामुळे नेहमीच वाईट कृत्ये  करणेही टाळा त्यामुळे जीवन अधिक सुखकर होईल.
*संकलन :अनिल देव*
गौतम बुद्धांचे आयुष्या बद्दल विचार नक्की वाचा गौतम बुद्धांचे आयुष्या बद्दल विचार नक्की वाचा Reviewed by Raj Network Team on September 26, 2020 Rating: 5

Adnow

loading...
Powered by Blogger.